गौतमी पाटील मराठा आहे कि नाही |Gautami Patil News Today
प्रत्येक आठवडा आन महिना सरतो ना सरतो तोच गौतमी पाटिलचा काय ना कायतर वाद बाहेर येतोच.. म्हणजे वाद हा आता तिच्या नावापुढं जोडलेला कायमस्वरूपीचा शब्द झालाय.. सुरुवात झाली तिच्या अश्लील डान्सवरून.. तिथून ती जी का हू म्हणून चर्चेत आली ते काय इचारूच नका.. तिच्या कार्यक्रमाना होणारी गर्दी, तिथ होणारी भांडण, इंदोरीकरांच तिच्या मानधनाबाबतीतच वक्तव्य, तीचा कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ, उदयनराजेंची भेट, छोटा पुढारी घनश्याम दराडे याचं वक्तव्य या आणि अशा एका मागोमाग एक घडणाऱ्या घटना आणि त्या नंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन- ऑफलाईन अशा प्रत्येक स्तरावर तिच्यावर होणाऱ्या टीकांमुळ गौतमी पाटील हा महाराष्ट्राच्या सगळ्या माध्यमांवर कायम नवीन फोडणी देऊन शिजत राहिलेला विषय झालाय.. त्यामुळं गौतमीच्या बॉयफ्रेंडच्या नावापासून ते अगदी तिच्या मानधनाचा आकडा एवढंच काय तर तिच्याबाबतीतली छोट्यातली छोटी गोष्ट सुदिक जाणून घ्यायला तुमच्या आमच्या सारखी काही उत्साही मंडळी पाक टाचा वर करून तयार असत्यात.. पण आता ह्या गौतमीच नाव एका वेगळ्याच कारणान चर्चेत आलय आन ते म्हणजे गौतमीच आडनाव.. सबसे कातील गौतमी पाटील या नाऱ्यान प्रसिद्ध झालेल गौतमीच आडनाव मुळात पाटील नाहीचं अशी चर्चा करण्यासाठी पुण्यात चक्क अलीकड एक बैठक सुद्धा पार पडलीय.. एकंदरीत काय तर आता इथून पुढं गौतमी पाटीलचा एक बी विषय सोडायचा नाय आस गड्यांनी बहुतेक ठरवूनच टाकलय.. आता तर तिला कुणी म्हणजे कुणीचं बोलायचं सोडत नाय.. रायला सायला त्यो छोटा पुढारी घनश्याम दराडे सुदिक तिला काही दिवसांपूर्वी बोलून गेलाय.. ते जाऊद्या लांबड लावण्यापेक्षा आपण आपलं गौतमीचं हे नवीन प्रकरण नेमकं काय आहे ते व्यवस्थित समजावून घेऊयात.. 'Gautami Patil News Today'
नमस्कार मित्रांनो माझ नाव अनिकेत तुम्हाला तर माहितीये आपला पार्टनरच वेगळाय.
![]() |
| गौतमी पाटील मराठा आहे कि नाही | Gautami Patil News Today |
तर मंडळी गौतम पाटील,गौतम पाटील, गौतम पाटील म्हणजे बघा आता जगात सगळं संपलं आणि जगात ती एकटी शिल्लक राहिली असं वाटायला लागले. म्हणजे तिचा विषय संपता संपत नाहीये नाही हो नाही थोडं तर मोकळं सोडा तिला उठ सूट सगळी तिच्याच मागे लागले अजित पवार पासून ते इंदुरकर महाराज पर्यंत आणि तुमच्या आमच्या पासून ते थेट छोटापुढारी घनश्याम दराडे पर्यंत. सर्वच तिच्याबद्दल चर्चा करतायेत गौतमी ताई तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करू नका तसं केलं तर चुकीला माफी नाही. कलाही कलेच्या जागी राहू द्या. उगाच फेमस होण्यासाठी काही वेगळं करू नका. फेमस व्हायचं असेल तर तुमची कला दाखवून व्हा. असं तगड आव्हान नुकतच घनश्याम दरोडे ने केला आहे. म्हणजे तिला कोण जगू देयनाराव कधी तिचे डान्स वरून तर कधी तिच्या मानधनावरून आता तर काय तिचं आडनाव पकडला आहे. Gautami Patil News Today
मध्ये देखील अजित पवार साहेबांना एका पत्रकारांनी गौतमी बैला समोर नाचणार आहे. या संदर्भात प्रश्न विचारला तर त्यावर अजित पवार साहेब स्वतः म्हणाले कि ते तिचे उपजीविकेचे साधन आहे. बैला समोर नाचते की आणखी कुठे हा सर्वस्वी तीचा प्रश्न आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे सध्याच्या घडीला तिचं नाव गाजतय जिकडेतिकडे तेच नाव गाजत आहे.
सध्याचा विषय सुरू झाला पुण्याच्या शिवबा संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा महासंघाचे समन्वयक राजेंद्र झराड यांच्यापासून गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून ते चाबुकस्वार आहे. पाटील हे नाव लावून ते पाटलांची बदनामी करते पाटील मराठ्यांचे आडनाव आहे हे आडनाव वापरून मराठ्यांना बदनाम करण्याचे तिचे षडयंत्र आहे. गौतमीने पाटील आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी गौतमीला दिला आहे. एवढेच नाही तर या विषया संदर्भात पुण्यात एक बैठक पार पडली अशी मीडियामध्ये चर्चा आहे.Gautami Patil News Today
त्यामुळे पुण्यात गौतमीच्या आडनावावरून पुन्हा एकदा या नव्या वादांना जन्म घेतला आहे. पण आता नुकतीच सांगली, सातारा, कोल्हापूर. पुणे सह राज्यातील विविध भागात आपल्या नृत्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर गौतमी पाटील काल विरार मध्ये आली होती. काल पहिल्यांदाच विरारमध्ये गौतमीचा कार्यक्रम पार पडला त्यामुळेच तिथल्या कार्यक्रमाला खूप गर्दी झाली होती नेमकं याच वेळी गौतमीन मीडियाचे संवाद साधला. तिच्या आडनावावर मराठा संघाने विरोध केलाय त्याबाबत तिला जेव्हा विचारलं तेव्हा तिने उत्तर दिलं की "Gautami Patil News Today"
मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना... मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही... मला कोणी ..काहीही बोलतं.....मला काही फरक पडत नाही. नो कमेंट्स.. पण जर माझ्या कार्यक्रमावरुन ज्या कोणाला प्रश्न असतील त्यांनी माझा कार्यक्रम पाहायला याव... मी कसलीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. तो मी पार पाडत असते.... चांगला कार्यक्रम होत असतो.... कोण मला नाव ठेवतो तर मला त्याचा फरक पडत नाही... कुणाला माझ्या कार्यक्रमावर आक्षेप असेल, प्रश्न असेल तर त्यांनी यावं... अगोदर माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा आणि मगच बोलाव....
नंतर विचारलं की तुम्ही राजकारणात येणार का..? तिने उत्तर दिलं की मी राजकारणात येणार नाही.. अजिबात असं काही नाहीये.... असं थेट उत्तर देत त्या चर्चेला थांबवलं.Gautami Patil News Today
आणि आपला आडनाव च्या चाबुकस्वार नाही तर पाटील आहे असं तिने स्पष्ट सांगितले. त्यामुळे तिच्या पाटील आडनावाबद्दल आत्ता शंका निर्माण झाली आहे. एकूण असं सगळं प्रकरण घडलं आहे. आता तिच्या बद्दल किती आणि कसेही वाद असले तरी गौतमी मात्र आज डिप्रेशन असणाऱ्या लोकांवर बौजार औषध झाला आहे. त्यामुळे तिच्या त्या आडनावावरून तयार झालेल्या वादावरून तुम्हाला नेमकं काय वाटते ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर मित्रांना शेअर करा सोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
.........धन्यवाद..........
![]() |
| Click Here |


0 Comments