तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?
![]() |
| तंबाखू सोबत चुनाच का मळतात..? |
त्येदिशी दिन्या बापू बर रानात वैरणीच्या पेंड्या बांधायला गेलोवतो. 12 वाजेपर्यंत दोघांनी 20 पाचूंदं म्हंजी 100 एक पेंड्या बांधल्या. उन्हाचा तडाखा वाढला तसं मी बापू म्हणलं उलीस सावलीला बसू, मी गावातनं रेडबूल निदान स्टिंग एनर्जी ड्रिंक घेऊन येतो. तवर पाणी बिनी पिऊन घे. तर बापू म्हणला, हे कोल्ड्रिंग्ज बिल्डिंग्ज, पांचाट माल. तुला आण. आपुन यक तंबाखूचा आर टाकला की आपली गाडी बुंगाट. सुट्टीचं नाय. मी म्हणलं लगा बापू, दारू नाय, चिलीम नाय, सिगरेट नाय, ह्यो काय तंबाखूचा चळ भरलाय तुला. तर बापू म्हणला, तुला नाय कळायचं, तंबाखू न चुना, काम दणादणा काचकन किक बसली पायजे तर. तंबाखूबाबतीत बापू पुढं डोकं आपाटलं तरी त्यो कुणाचं ऐकत नाय. पण हो, माहिती सुरु करायच्या आंदीच तुम्हाला पक्की वॉर्निंगय, तुम्ही तंबाखू चुन्याच्या भानगडीत पडू नका. तंबाखूनं काय हुतंय सांगू सांगू आता सरकार बी कटाळलंय. उगाचं जीवानिशी जालं. तर आजच्या माहीतीचा मुख्य मुद्दाय, तंबाखू सोबत चुनाचं का मळतात..? विषय गंभीरय, ध्यान देऊन वाचा.... तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?
नमस्कार मि अनिकेत तुम्हाला तर माहितीये आपला पाॅटर्नच वेगळा.....!
तर मंडळी जिवाचा धोका सांगुन सुधा लोंकाच तंबाखू बद्दल येवढ आकर्षण का आहे..? ते तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि डाईरेक विषयाला वाचा फोडतो.
हल्ली गाव कुसात चुना मिक्स तंबाखू हा प्रकार काय आता फक्त खाण्याचा विषय राहिलेला नाही. तर तो प्रेम आपुलकी वाढण्याचा आणि वाढवण्याचा विषय झालेला आहे. म्हणजेच कोणाशी अशीच ओळख पाळक वाढवायची असल तर तंबाखू शिवाय बेस्ट पर्याय पण ही ट्रिक तंबाखूच्या अधीन झालेले लोकांच्याच कामाची बरका नाहीतर तुम्ही बिना कामाचं झिंगाल. 'तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?'
अनुभवी ड्रायव्हरा कडून आणखीन एक महत्त्वाचा उपयोग सांगितला जातो आणि तो म्हणजे सकाळी विडा लावल्याशिवाय किकच बसत नाही. विडा म्हणजे काय हे डबल मळ संघटनेच्या लक्षात आलंच असेल ही तंबाखू कोणासाठी तरतरी आनन्या च काम करते तर कोणासाठी प्रेशर क्रियेट करण्याचं पण शेवटी काय तंबाखू त्यांच्या त्यांच्या टाईपची माणसं जोडत असते. आता इथे सांगण्या सारखा मुद्दा म्हणजे जसं लोकांना वाटतं खाल्ल्याने त्यांना प्रेशर क्रिएट होतं अगदीच तसं काही नाही तंबाखू मळताना एका हाताच्या बोटाने दुसऱ्या तळ हातावर जे घर्शन होतं त्या बोटानी प्रेशर हिल होत असतं त्यामुळे पोरांना मोकळं होण्याचा प्रेशर येत असतं तेला ऑक्यू प्रेशर असं म्हणतात.
पण तंबाखू खाण्याच निमित्त शोधणारी आपली जनता उगाच प्रेशर चे सगळं क्रेडिट तंबाखूला देऊन टाकते. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या मेंदूला तिची सवय लागते आणि त्याची मेंटॅलिटी प्रेशर क्रिएट करायला लागते. 'तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?' दुसरी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तंबाखू खाल्ल्यावर माणसाला तरतरी येते म्हणजे एखादं काम करायला उत्साह येतो तर ऐका तंबाखूत निकोटीन नावाचा एक घटक असतो. बरोबर गळा काढून सिगरेट सोडा सांगणाऱ्या शासनाच्या जाहिरातीत निकोटीन हे नाव नक्कीच ऐकलं असेल. तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?
आता हे निकोटीन काय करतं तर तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीच्या थेट मेंदूच्या चेतासंस्थेवर परिणाम करत त्याला इंग्लिश मध्ये न्यूरोसिस्टम असं म्हणतात तसंही सांगायची गरज नव्हती पण मला तेवढीच इंग्लिश येते म्हणून उगं शेंडा फोडला तरी ती चेतासंस्था म्हणजे न्यूरोसिस्टम म्हणजेच काय..? तर तिथून आपला मेंदू आपल्या पूर्ण शरीराच्या प्रत्येक अवयवाला काम करण्याची ऑर्डर देतो ती जागा म्हणजे न्यूरोसिस्टम तर त्या परिणामामुळे होतं काय..?आपलं ठराविक काळासाठी एखाद्या गोष्टीकडे व कामाकडे अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित होतं. निकोटीन मुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता तत्पर होते पण ते निकोटीन माणसाच शरीर दीर्घ काळासाठी घंगुन सोडत बर का. तर असा हा सारा पिक्चर आहे.. तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?
मंडळी विल्यम मेथेवाल नावाचा विजयपूर शाखेचा एक ब्रिटिश पाहुणा होता त्याच्या म्हणण्यानुसार सतराव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात पहिल्यांदा कोरोमंडल कोष्ट येथे पहिल्यांदा तंबाखूच्या शेतीला सुरुवात झाली आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने भारतात व्यापक स्वरूप धारण केलं हा झाला थोडक्यात इतिहास आता राहिल्या तुमच्या क्युरो सिटी चा प्रश्न. तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?
तंबाखू सोबत चुनाच का मारतात..? तर ऐका तंबाखू मध्ये निकोटीन असते हे तुम्हाला माहीतच आहे निकोटीन हा एक आम्ल पदार्थ आहे आणि चुना हा आम्लारी पदार्थ आहे आठवीच्या विज्ञानात शिकला असतालच तुमच्यामध्ये बऱ्याच जणांना हे माहिती असेल की आम्ल आणि आम्लारी यांचे मिश्रण होतं तेव्हा त्यांच्यात न्यूट्रल म्हणजेच उदासीन क्रिया घडते त्यामुळे तंबाखू आणि चुना एकत्र मिळून खाल्ला तर खाणाऱ्याच्या तोंडाला लवकर इजा होत नाही पण काही काळानंतर त्याचे वाईट व लॉन्ग टर्म परिणाम दिसू लागतात हे नक्की.. तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?
तसंच जर कुणी नुसती तंबाखू किंवा चुना तोंडात धरला तर दोन्ही पदार्थ तात्काळ तुमच्या तोंडाला किंवा शरीराला इजा करू शकतात. चुना जास्त वेळ तोंडामध्ये धरला तर चुन्याने तोंड भाजतं आणि तोंडाच्या आतल्या बाजूने कातड निघायला सुरुवात होते तंबाखूचे तर त्यावरून भयंकर मोकळी तंबाखू तोंडात धरण मोस्ट ऑफ टाईम कॅन्सर वर जातं म्हणून तंबाखू आणि चुना दोन्ही मिळून खाने सोप आहे असं समजू नका. त्यामुळे ही तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि आपल्याकडे अजून कॅन्सर वर डोस उपलब्ध नाहीत हे तुमच्या लक्षात असू द्या. आपला धरतीवरचा कार्यकाळ लवकर आठपायचा नसेल तर तंबाखूला लांबूनच राम राम करा. "तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?"
तंबाखूचे व्यसन लय वाईट गड्या त्याचे वरचे तोटे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंबाखू मध्ये जास्त प्रमाणात अँटी आशन असतात त्यामुळे होतं काय तर तुमच्या लिंग कडे जाणाऱ्या रक्तपुरवठा कमी होतो आणि तुम्हाला नपुसकपणा येण्याचे चान्सेस वाढतात तसेच तुमचा स्पर्म काउंट ही कमी होतो त्यामुळे तुमचा त्या कामातील आनंद हरवतो त्यामुळे एक तर तंबाखूचा नाद करूच नका आणि करत असाल तर तातडीने सोडा आणि आपल्या जवळपास कोण तंबाखू खाणारा असेल तर त्याला हे वाचायला सांगा आणि म्हणाव रेईलिटी बघ... तंबाखू सोबत चुनाच का मळतात..?
तसेच ही माहिती आवडली असेल तर सर्वांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा
WhatsApp Group Link
https://chat.whatsapp.com/FfIANA8QkXY131G5u786DM
![]() |
| तंबाखू सोबत चुनाच का मळतात..? |


1 Comments
Mast
ReplyDelete